पाषाण येथे क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

0
slider_4552

पाषाण :

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सचिन पाषाणकर, उत्तम जाधव, राजेंद्र पाषाणकर, प्रकाश गोडाबे, केशव कोकाटे, संतोष वेल्हाळ, विजय सुपेकर, नारायण जाधव, आकाश पवार, मंगेश आंबरुळे उपस्थित होते.

यावेळी सचिन पाषाणकर यांनी सांगितले की,महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे वंदनीय व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन करत आहोत. समाजातील प्रत्येक आदर्श व्यक्तिमत्वाचा आदर राखून अशा थोर व्यक्तिमत्वाची जयंती साजरी व पुण्यतिथी ला अभिवादन केले जाते असे त्यांनी सांगीतले.

See also  अमेनिटी स्पेस भाड्याने देणे निर्णया विरोधात बाणेर बालेवाडी राष्ट्रवादीचे आंदोलन.