पुण्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात नव्याने काही निर्बंध घालण्याचा विचार : महापौर

0
slider_4552

पुणे :

पुण्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात नव्याने काही निर्बंध घालण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिवसेंदिवस पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच जात आहे.

पुणे शहरात आज नव्याने १ हजार ३५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ११ हजार ५२१ इतकी झाली आहे. आज पुणे महापालिका हद्दीत नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ९१० इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ७ हजार ७१९ रुग्णांपैकी ३६४ रुग्ण गंभीर तर ७२१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.आज एकाच दिवसात ७ हजार ७२१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १२ लाख १२ हजार ३४७ इतकी झाली आहे.

शहरातील ६४६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १ लाख ९८ हजार ८९२ झाली आहे.

पुण्यातील परिस्थिती चिंताजनक असली तर असं असलं तरी पुण्यात संपूर्ण लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही नसल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी यावेळी दिलेली आहे. सध्या पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू आहे तर शाळा आणि महाविद्यालयं देखील बंद ठेवण्यात आली आहेत. असं असलं तरी रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिकचे काही निर्बंध लावण्याचा विचार महापालिका पातळीवर सुरू आहे.

See also  शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू : बापट