पाषाण :
पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या मध्यान्न भोजनात चक्क गुरांचा खुराक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मनसेचे पुण्यातील नेते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पाषाण येथे संत तुकाराम प्राथमिक विद्यालय धान्य घेऊन आलेला ट्रक परत पाठवून दिला.
दोन दिवसापूर्वी राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाचा पोषण आहारासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतलीय. तसेच या प्रकारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलीय. तसेच कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. हा प्रकार झाला असताना देखील अजूनही काही शाळांवर निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य पाठवले जात आहे.पाषाण येथे संत तुकाराम शाळेत ट्रक पाठवण्याची माहिती मिळाली असता याठिकाणी याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली व तो ट्रक खाली न करता पुन्हा घेऊन जाण्यास सांगितले.
या प्रसंगी मनसेचे अनिकेत मुरकुटे यांनी सांगितले की, दोन दिवसापूर्वीच हा प्रकार शहरात उघडकीस आल्या नंतर परत तोच प्रकार घडतोय गरीब विद्यार्थांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असुन तो त्वरित थांबला पाहिजे. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने राज्यभर आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
याप्रसंगी मनसेचे संजय काळे यांनी सांगितले की, शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण अधिकारी यांना हे धान्य वाटप करण्याचे नाही सांगितले. एफ डी आय आय कडून आलेल्या रिपोर्ट नंतर संबंधितावर कारवाई करण्याचेही सांगितले आहेत. या प्रसंगी गणेश शिंदे, अनिकेत मुरकुटे, अशोक दळवी शशिकांत घोडके, अमित राऊत, संजय काळे आदी उपस्थित होते.