पुणे शहर :
निगडी आणि कात्रजसह चांदणी चौक, वाघोली, खराडी, हडपसर, लोणी काळभोर, कात्रज, खडकवासला, वारजे अशी सर्व उपनगरे पहिल्या टप्प्याला जोडून संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जाणार आहे.
पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाकमार्फत (पुमटा) टप्पा-२ साठीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला जाणार असून, राज्य सरकारने त्याला मान्यता दिल्यानंतर सर्व मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे. ‘पुमटा’च्या बुधवारी झालेल्या बैठकीत मेट्रोच्या सर्व विस्तारित मार्गांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या हडपसर आणि त्यापुढे लोणी काळभोरपर्यंतच्या विस्तारासाठीचा डीपीआर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) तयार करण्यात येईल, असेही या वेळी निश्चित करण्यात आले.
मेट्रो टप्पा-२ मार्ग किमी पिंपरी-चिंचवड ते निगडी ४.४१ स्वारगेट ते कात्रज ५.४६ वनाझ ते चांदणी चौक १.५ रामवाडी ते वाघोली १२ हडपसर ते खराडी ५ स्वारगेट ते खडकवासला १३ एसएनडीटी ते वारजे ७ शिवाजीनगर ते हडपसर ११.७४ स्वारगेट ते हडपसर ८ एकूण प्रस्तावित मार्ग ६८.११