दिल्ली :
एकट्याने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला देखील मास्क घालणे बंधनकारक असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) म्हटले आहे. मास्क हे ‘सुरक्षा कवच’ म्हणून काम करत असून त्यामुळे कोविड-19 (Covid-19) चा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या मास्क बंधनकारक करण्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या चारही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. तसंच कारमध्ये एकच व्यक्ती जरी असला तरी तो सार्वजनिक ठिकाणी असतो, असं न्यायालयाने पुढे म्हटलं आहे.
खाजगी वाहनातून एकट्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मास्क घालणं दिल्ली सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं होतं. मास्क नसल्यास 500 रुपये दंड देखील आकारला जात होता. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळेस दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
वैज्ञानिक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारकडून कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. लसीकरण सुरु झाले असले तरी संकट टळलेले नाही. त्यामुळे मास्क वापरणं गरजेचं असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, दिल्लीतही कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
Delhi High Court rules mask mandatory even if a person is driving alone. It states that a mask acts as a 'suraksha kavach' which would prevent the spread of COVID19. pic.twitter.com/litzyIQ4iN
— ANI (@ANI) April 7, 2021