आयोद्या :
अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पुरुषांच्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने गुरुवारी उप उपांत्य फेरीत उत्तर प्रदेश चा पाच पाच चढाया मध्ये एक गुणांनी ३८-३७ असा पराभव केला. या विजयासह महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली आहे.
अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या हाफ च्या १६-२२ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या हाफ मध्ये सामना बरोबरीत संपवला. त्यानंतर झालेल्या पाच-पाच चढायाच्या लढती मध्ये महाराष्ट्राने एक गुणाच्या फरकाने विजयाचा पाया रचला. अतीशय तगडा गणला जाणारा उत्तर प्रदेश चा संघ महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापुढे नमला. राहूल चौधरी आणि नितिन तोमर यांनी प्रयत्न करुन देखील उत्तर प्रदेश ला पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्राने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत उत्तर प्रदेश वरती लोन चढविला आणि मध्यंतराच्या पिछाडी भरून काढली. सिद्धार्थ देसाई च्या आक्रमक चढाया आणि गिरिष इरणाक च्या सुंदर पकडीच्या जोरावर उत्तर प्रदेश ला हरवले. पाच पाच चढाया मध्ये मोक्याच्या क्षणी नीलेश साळुंखे याने बोनस प्लस गुण वसूल केल्याने व गिरीष इरणाक याने राहूल चौधरी ची केलेली पकड विजयात पाया रचणारी ठरली.