कोरोना महामारीचे जगावर आलेले संकट हे मागील 100 वर्षांतील सर्वात मोठे आणि भयंकर असे संकट आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोनासंबंधातील देशातील परिस्थिती सांगत दोन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये येत्या 21 जूनपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी मोफत लस आणि दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून 18 वर्षांवरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे.
देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार त्यासाठी राज्य सरकारला मोफत लस पुरविले जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत पुढे वाढवली जाणार दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य मिळणार असेही सांगण्यात आले आहे.
PM Modi announces centralized vaccine drive, all vaccines will be procured by Govt of India and given to States for free. pic.twitter.com/wBuKFLfm5q
— ANI (@ANI) June 7, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत पुढे वाढवली जाणार आहे.. या महामारीच्या काळात गरिबांच्या प्रत्येक गरजा लक्षात घेत, सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. देशातील नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत 80 कोटीहून अधिक देशवासीयांना दर महिन्याला नि:शुल्क अन्नधान्य निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल. गेल्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 8 महिने मोफत धान्य नागरिकांना पुरवण्यात आलं होतं. यंदाची कोरोनाच्या संकटामुळे रोजगार बंद होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेतही मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. आता ही योजना दिवाळीपर्यंत लागू असणार आहे.त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे.