पाषाण :
प्रभाग क्रमांक 9 ची सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक झाली. शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, बाळासाहेब भांडे , शर्वरी गावंडे, संजय निम्हण, संतोष तोंडे, अमित रणपिसे, दिनेश नाथ, अक्षय भेगडे, योगेश तुपे, सुनील कळमकर, सातव, लक्ष्मन दिघे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक बैठकीला उपस्थित होते.
शहर प्रमुख गजानन भाऊ थरकुडे यांनी सर्वांना चांगले मार्गदर्शन केले. येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसे काम करायला पाहिजे यावर मार्गदर्शन केले. शिवसेना कशी वाढवता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. शिवसेना वाडी करता नियोजनबद्ध मोर्चे बांधणी करावी असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुचविले.
बाळासाहेब भांडे यांनी राज्य सरकारच्या वतीने गरीबांना, वंचितांना राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच शर्वरी गावंडे यांनी सोशल मीडिया वरील प्रचार यावर मार्गदर्शन केले. नक्किच सर्व पदाधिकारी व शिवसैनिक नव्या दमाने व जोमाने कामाला सुरुवात करतील . शहरप्रमुख गजानन थरकुडे यांना प्रभाग 9 मधील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याकडून शाल व रोपटे देवून सन्मानित करण्यात आले.