कोरोनाचे डेल्टा स्वरूप अत्यंत खतरनाक ! कोणताही देश सुरक्षीत नाही : WHO

0
slider_4552

संयुक्त राष्ट्र जागतिक आरोग्य संघटनेचे ( डब्ल्यूएचओ ) WHO चे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी जग कोरोना महामारीच्या अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचल्याचा इशारा दिला आहे. जग कोरोना महामारीच्या अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. कोरोनाचे डेल्टा स्वरूप अत्यंत सांसर्गिक असून, ते कालानुरूप स्वतःचे रंगरूप ( उत्परिवर्तन ) बदलत आहे.

विशेषतः लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या देशांत पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. असे त्यांनी म्हटले आहे. कोरानाचा डेल्टा व्हेरियंट अत्यंत संक्रामक आहे. हा व्हेरियंट जगातील अनेक देशांत पसरत असल्यामुळे ही महामारी अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचली आहे, असे टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

कोणताही देश धोक्याबाहेर नाही. डेल्टा स्वरूप अत्यंत खतरनाक आहे. त्याच्यात कालानुरूप उत्परिवर्तन होत आहे. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने नजर ठेवण्याची गरज आहे. असे ते म्हणाले . डेल्टा स्ट्रेन जगातील जवळपास 98 देशांत आढळला आहे. हा व्हायरस कमी – जास्त लसीकरण झालेल्या देशांत झपाट्याने पसरत असल्यामुळे चोख निगराणी, तपासणी, प्राथमिक टप्यात आजाराचा शोध घेणे, विलगीकरण व वैद्यकीय देखभालीसारखे सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाय आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असे ते म्हणाले.

मास्कचा वापर, सामाजिक अंतर, गर्दीची ठिकाणे टाळणे व घरात हवा खेळती ठेवणे हेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, धोकादायक व्हायरसची उत्पत्ती रोखण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येक देशाच्या ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करणे हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचेही घेब्रेयेसस यावेळी म्हणाले.

See also  महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान