उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी घेतलेला उपक्रम हा सामान्य जनतेला आधार देणारा आहे- विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे

0
slider_4552

बाणेर :

शिवसेनेच्या माध्यमातून गरजू महिलांन पर्यंत मदत पोहचवली जात आहे. राजेन्द्र धनकुडे यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेवुन खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमूख उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यात सातत्याने येणाऱ्या अडचणी मध्ये खंबीरपणे जनतेच्या पाठीशी राहण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत तसेच शिवसेना देखील दरड कोसळली पुराला अशा ठिकाणी मदतकार्य पोहोचवत आहे. तसेच समाजातील सर्व घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. असे विधान परिषद उपसभापती निलम गो-हे यांनी सांगितले.

बाणेर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या माध्यमातून बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे परिसरातील गरीब कुटुंबांना अन्य धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख संजय मोरे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख विजय देशमुख, सहसंपर्कप्रमुख प्रीतम उपलप, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, रोहिणी धनकुडे, संतोष तोंडे, अशितोष आमले, प्रदीप खोपडे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे , बाळासाहेब भांडे, ज्योती चांदेरे, नितीन पवार, श्याम बालवडकर पांडुरंग बालवडकर, महेश सुतार, उल्हास शेवाळे, सुहास धनकुडे, गणेश साळुंखे, अंकुश ससाणे, राजाभाऊ कविटकर, आदी उपस्थित होते. तसेच बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील महिलांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.

रवींद्र मिर्लेकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हे जनतेशी सातत्याने संवाद साधताना आपलेसे वाटतात. कोरोना, वादळ, व महापूर अशा नैसर्गिक आपत्ती यांचा सामना राज्य करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. तसेच काम राजेन्द्र धनकुडे शिवसेनेच्या माध्यमातून करत आहे. शिवसेना वाढविण्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.

See also  डॉ सागर बालवडकर यांच्या प्रयत्नांना यश , बालेवाडी मधील सोसायट्यांना मिळणार पाईप द्वारे गॅस.