बालेवाडी :
मंगळवार दि 4 मे 2021रोजी सकाळी 10 वाजता MNGL गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन कुणाल अस्पायर सोसायटी जवळ, बालेवाडी येथे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
बालेवाडी परीसरात MNGL गॅस पाइप लाइन द्वारे नागरीकांना घराघरात गॅस पुरवठा व्हावा,सोसायट्या सिलेंडर मुक्त व्हाव्यात म्हणून डॉ. सागर बालवडकर गेले अनेक दिवस प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले व गॅस पाईपलाईन साठी परवानगी मिळाली. या गॅस पाईप लाईन मुळे कुणाल अस्पायर सोसायटी व परिसरातील सर्व सोसायटी मधील कुटुंबांना या सर्वांना पाईप लाईन च्या माध्यमातून गॅस सुविधा मिळणार आहे.
या प्रसंगी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, बालेवाडी परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरिता डॉ. सागर बालवडकर नेहमीच आग्रही असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नेहमीच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी डॉ. सागर प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले. गॅस पाइप लाइन मुळे नागरीकांना सुविधा उपलब्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मॅक न्यूज शी बोलताना सागर बालवडकर यांनी सांगितले की, गॅस सिलेंडर मुळे होणारे अपघात व तो मिळविणे करता नागरिकांना होणारा मनस्ताप थांबण्याच्या दृष्टीने गेल्या अनेक दिवसापासून MNGL गॅस पाईप लाईन साठी आवश्यक परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करत असताना परवानगी देण्यात पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांचे मोलाचे योगदान लाभले. MNGL च्या माध्यमातून पाईप लाईन ने गॅस पुरवठा हा अतिशय सुरक्षित असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष डॉ सागर बालवडकर, नितीन कळमकर, मनोज बालवडकर पाटील, विशाल विधाते, चेतन बालवडकर, सुमित चॅटर्जी, मधुकर देशमुख, विक्रांत रोहमारे, अंकित शहा, दीपेंद्र भादोरिया, गोपल श्रीनिवासन, हेमंत जोशी, उमेश जैस्वाल, शंभू ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.