टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये दहावा दिवस (२ ऑगस्ट) भारतीय पथकासाठी चांगलाच लाभदायी ठरत आहे. सकाळच्या सत्रात भारतीय महिला हॉकी संघाने इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत स्थान पटकावले. तर, महिला थाळीफेकपटू कमलप्रित कौर अंतिम फेरीत उतरणार आहे. त्यासोबतच भारताचा घोडेस्वार फौआद मिर्जा व त्याची घोडी सेगनर मेडीकोट यांनीदेखील अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा फौआद एकमेव भारतीय घोडेस्वार ठरला आहे.
अशी राहिली कामगिरी
फौआदच्या रूपाने इतिहासात प्रथमच भारतीय खेळाडू घोडेस्वारी प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता आणि सोमवारी झालेल्या पात्रता फेरीमध्ये फौआद व सेगनर मेडीकोट या जोडीने ८.०० पेनल्टी गुणांसह एकूण ४२.२० गुण मिळवत अंतिम फेरीसाठी पात्रत मिळवली. तो २५ व्या क्रमांकावर राहिला.







आशियाई स्पर्धेत जिंकले होते रौप्यपदक
फौआदने २०१८ जकार्ता आशियाई स्पर्धेत दोन रौप्य पदके जिंकली होती. ऑलम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला घोडेस्वार होण्याचा मान त्याला मिळाला आहे.








