पुणे महानगरपालिकेत यापूर्वी समावेश झालेल्या 11 गावांसाठी आणि नव्याने समावेश झालेल्या 23 गावे असे एकूण 34 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाला प्रस्ताव देण्यात येणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यात मिळाली आहे. मुळशीतून पाणीसाठा उपलब्ध झाल्यास पुण्याचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल.
महापालिकेच्या हद्दीत नव्याने 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुणे शहराची हद्द वाढली आहे शिवाय लोकसंख्या 10 ते 12 लाखांनी वाढणार आहे. यामुळे शहरातील पाण्याची गरज लक्षा घेऊन पुणे महापालिकेने मुळशी धरणातून पाणी घेण्याचे नियोजन केले आहे. सध्या पुणे शहराला खडकवासला धरणातून 11.5 टीएमसी एवढा पाणीसाठी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेला भामा आसखेड धरणातून 2.64 टीएमसी आणि पवना नदीमधून असा एकूण 14.48 टीएमसी पाणी साठा मंजूर आहे. मागील अनेक वर्षापासून पालिकेच्या पाणी कोट्यात वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षात पाण्याचा वापर वाढला असून पालिका सध्या 18.58 टीएमसी पाण्याचा वापर करत आहेत.
या संदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या अधिक्षक अभियंता मनिषा शेकटकर यांनी सांगितले, पालिका प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाची मंजूरी मिळवू असा प्रस्ताव दिला.
पालिकेमध्ये नव्याने गावांचा समावेश झाल्याने पाण्याची गरज वाढली आहे. तसेच वाढीव पाणीपट्टीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. शहर सुधारणा समिती आणि मुख्यसभेची याला मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
पुणे शहराची सध्याची पाण्याची गरज
वर्ष पाण्याची गरज
2015-16 13.39