दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलगा ते ऑलम्पिक पदक विजेता रवी कुमार दाहिया

0
slider_4552

मुंबई :

टोकियो ऑलम्पिकमध्ये कुस्ती खेळ प्रकारात भारताने गुरूवारी सिल्व्हर पदकाची कमाई केली. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरातील मुलगा ते ऑलम्पिक पदक विजेता खेळाडू अशी फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी रवी कुमार दाहियाने मारली आहे. घराची हालाकीची परिस्थिती असताना केवळ कुटूंबियांचा पाठिंबा आणि इच्छा शक्तीच्या जोरावर रवीने हे यश मिळविले आहे. आर्थिक तंगी असलेल्या रवीवर आज मेडल मिळाल्यानंतर करोडो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

रवी कुमार दहिया याने 2019 मध्ये काजाखिस्तान मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड रेसालीनग चैम्पियन’ स्पर्धेत कांस्य पदक पटकावून ऑलम्पिकसाठी पात्र ठरला होता. रवी हा 5 फुट 7 इंच उंच्ची असलेला सर्वात उंच पाहिलवाणांपैकी एक आहे.

1997 मध्ये रवी कुमार दहिया याचा जन्म हरियानाच्या सोनिपत जिल्ह्यातील नाहरी गावात झाला. तेव्हा त्यांचे वडील दुसऱ्याच्या शेतात काम करीत असत. 10 वर्षांच्या वयातच रवीने दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम मध्ये ट्रेनिंगला सुरूवात केली. 1982 साली एशियन गेमसमध्ये सुवर्णपदक विजेते सत्यपाल सिंह यांच्या कडून त्याने प्रशिक्षण घेतले आहे.

रवी पैलवान होण्यात त्याच्या वडिलांचा खूप मोठा हात आहे. घराची हालाकिची परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या मुलाचे प्रशिक्षण थांबू दिले नाही. रवी चे वडील राकेश हे आपल्या गावाहून छत्रसाल स्टेडियम पर्यंत 40 किलोमीटर दूर रवीला फळ आणि दूध देण्यासाठी येत असत.

रवीने जेव्हा 2019 मध्ये ‘वर्ल्ड रेसालीनग चैम्पियन स्पर्धे’त कांस्य पदक मिळविले होते. तेव्हा सुद्धा रवीचे वडील त्याचा सामना पाहू शकले नाही. कारण तेव्हा ते दुसऱ्याच्या शेतात काम करीत होते. 2015 मध्ये ज्युनियर वर्ल्ड रेसालीनग चैम्पियन स्पर्धेत 55 किलो वजनी गटात त्याने सिल्व्हर पदक जिंकले होते. पण नंतर सीनियर गटात 2017 साली सीनियर नॅशनल गटात सामान्यदरम्यान दुखापत झाल्याने त्याला काही काल मॅट पासून दूर राहावे लागले होते. दरम्यान 2020 मध्ये दिल्ली येथे झालेल्या एशियन रेसालीनग चैम्पियन स्पर्धेत गोल्ड पादकाची कमाई केली होती.

See also  रोहित शर्मा झाला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार