मोदी सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी वाहन चालकांना दिला दिलासा, परमिट गरज नाही.

0
slider_4552

नवी दिल्ली :

मोदी सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी वाहन चालवणार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने बॅटरी, मिथेनॉल आणि ईथेनॉलवर चालणारी दुचाकी वाहने चालवणार्‍यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या वाहनांना परमिट घेण्याची आवश्यकता असणार नाही. या वाहनांचा विना परमिट कायदेशीर प्रकारे कमर्शियल वापर केला जाऊ शकतो. मंत्रालयाच्या या निर्णयाने टूरिझम इंडस्ट्रीला सुद्धा दिलासा मिळेल.

भाड्याने दुचाकी देणार्‍यांना होणार लाभ
रस्ते परिवहन मंत्रालयाने बॅटरी, मिथेनॉल आणि इथेनॉलवर चालणार्‍या दुचाकी वाहनांना आता परमिटमुक्त केले आहे.

मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना परमिटमधून सूट दिली होतीच, पण आदेशात दुचाकी वाहनांसाठी स्पष्ट निर्देश नव्हते.

दुचाकी वाहन ट्रान्सपोर्टर भाड्याने कायदेशीर प्रकार देऊ शकत नव्हते. आता ते याचा वापर करू शकता. याबाबत बस अँड कार ऑपरेटर्स कन्फेडेरशन ऑफ इंडिया चे चेयरमन गुरमीत सिंह तनेजा म्हणाले, रस्ते परिवहन मंत्रालयाच्या या निर्णयाने दुचाकी वाहनांना दिलासा मिळेल आणि टूरिस्ट इंडस्ट्री संबंधीत लोकांना फायदा होईल. गोवा आणि इतर पर्यटन स्थळांवर दुचाकी वाहने भाड्याने दिली जातात.

See also  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत