बालेवाडी :
रविवार दिनाक १५ ऑगस्ट २०२१ रोजी एस. के. पी. च्या भव्य प्रांगणात ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे, बालेवाडी रेसिडेंटल वेल्फेअर फेडरेशन चे चेअरमन अशोक नवल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि ध्वजगीत झाले.







संस्थेचे सचिव डॉ. सागर बालवडकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये प्राप्त केलेल्या यशाचा आनंद व्यक्त केला. तसेच सुवर्ण पदक प्राप्त नीरज चोप्रा चे अभिनदन केले .
प्रमुख पाहुणे अशोक नवल यांनी स्वतंत्र भारता समोरील समस्यांचा उल्लेख केला. या समस्येच्या निराकरण करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य जाणीव पूर्वक पार पाडण्याचा संदेश दिला.तसेच एस. के. पी. संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा आवर्जून उल्लेख केला.
खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जबाबदार नागरिकत्वाची कर्तव्ये विशद केली. कोरोना महामारी संपवण्यासाठी सर्वांकडून काळजीपुर्वक वर्तनाची अपेक्षा व्येक्त केली.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुदर्शन बालवडकर, प्रा. रूपाली बालवडकर, चैतन्य हास्य क्लब चे ॲड. माशालकर, कुलदीप विज, मित विज, प्राची सिद्दीकी, अंशुमाला सिंग, मिनल विधाले, माधुरीताई इंगळे, राखी श्रीवास्तव, मानसीताई पाटील, श्री म्हा. तू. बालवडकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य पोखरकर एस. वाय, डी. आय.एम.आर. चे डॉ.साजिद अल्वी आणि विविध विभागाचे प्रमुख,अध्यापक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी . आर डफल यांनी केले.








