पुणे महापालिकेतील रस्ते विभागाच्या उपअभियंत्यास ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

0
slider_4552

पुणे :

पुणे महापालिकेतील रस्ते विभागाच्या उपअभियंत्यास ता. २३ रोजी ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सुधीर विठ्ठलराव सोनावणे (वय ५१) असे लाच घेणार्‍या अधिकाऱ्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेचे रस्ते विभाग वर्ग २ मध्ये सुधीर विठ्ठलराव सोनावणे नेमणुकीस होते. २०१८/१९ यावर्षी एका शाळेचे दुरुस्तीचे काम फिर्यादीने केले होते. मात्र त्याचे बील अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. फिर्यादीस आरोपी सुधीर सोनावणे याने ५० हजार रुपये दिल्यास, तुमचे बील पास करून देतो, असे म्हणत लाचेची मागणी केली होती.

अखेर ४० हजार रुपये देण्याचे ठरले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आम्हाला देताच आज आरोपीला ४० हजार रुपये फिर्यादीकडून घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर आरोपी अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सांगितले.

See also  ४६ देशांमध्ये सायकल वर जाऊन नितिन सोनावणे यांनी गांधी विचारांचा प्रचार व प्रसार केला : डॉ. कुमार सप्तर्षी