बालेवाडी :
एसकेपी कॅम्पस बालेवाडी येथे बालेवाडी वुमन्स क्लब च्या वतीने ४ सप्टेंबर रोजी महिलांसाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. महिला उद्योजकांना ना नफा ना तोटा या तत्वावर कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिले होते.
महिलांसाठी खास आयोजन या वेळी केले होते अतिशय सुंदर असे व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून दिले गेले. अतिशय सुंदर आणि उत्तम दर्जाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. गीता कदम, मिसेस महाराष्ट्र निशा राठी आणि ज्योती आढाव उपस्थित होत्या.
वुमन्स फॅशन शो स्पर्धेचे विजेते
विजेतेपद : ॲनल कामदार
फर्स्ट रनरअप : श्रेया बडवे
सेकंड रनरअप : रीमा सिंग
या कार्यक्रमाचे आयोजन प्राची सिद्दिकी, विद्या पाथ्रीकर खुशबू अत्तरदे, यांनी केले तर फॅशन शोचे आयोजन नियोजन मानसी पाटील आणि अंशुमाला सिंग यांनी केले.
बालेवाडी वुमेन्स क्लबच्या अध्यक्षा रूपाली बालवडकर आणि मित विज यांनी स्वागत केले. प्राची सिद्दीकी यांनी सूत्रसंचालन केले. ‘नजाकात’, ‘लखनवी चिकन करी’ आणि ‘इरा’ इंटरवुमन डिझाईन यांनी फॅशन शो साठी स्पॉन्सरशिप दिली होती.