सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा हेच कर्तव्य समजून विविध उपक्रम.

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

भारतीय जनता पार्टी चे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा हेच कर्तव्य समजून गरजवंतांना अन्नधान्य किट, पावसाळ्यासाठी छत्र्यांचे वाटप आणि रिक्षा धारकांसाठी सीएनजी गॅस कूपन कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या हस्ते वाटण्यात आले.

यावेळी बोलताना पुनीत जोशी यांनी सांगितले की, सचिन दळवी हे लोकांच्या समस्या सोडविण्याकरिता रस्त्यावर उतरून पावसात भिजणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून केलेले काम पाहता लवकरच त्यांना पक्षांमध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

 

यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, सचिन दळवी हे रस्त्यावरती उतरून काम करणारे कार्यकर्ते आहेत. कोरोना च्या काळात देखील त्यांनी निर्भीडपणे सर्वसामान्य जनतेसाठी आवश्यक ती मदत केली. खऱ्या अर्थाने भाजपच्या चौकटीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून सचिन दळवी यांनी ओळख निर्माण केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सचिन दळवी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच लहू बालवडकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, संतोष धनकुडे, भाजपा युवा वॉरियर्स अध्यक्ष शिवम बालवडकर, स्वीकृत सदस्य शिवम सुतार, पप्पू शेठ चांदेरे, किरण बालवडकर, उत्तम जाधव, मनोहर आरगडे, शरद जोरे, सुनिल खुळे, भरत जोरे, विनायक काकडे, संतोष आरगडे, बाळा बामगुडे आणि सोमेश्वरवाडी ग्रामस्थ, नागरिक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सचिन दळवी मित्र परिवार आणि श्री विठ्ठल सेवा गणेशोत्सव मंडळ ( एक गाव एक गणपती) यांच्या वतीने करण्यात आले होते. स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन दळवी यांनी सेवाभावी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले.

 

See also  शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्यावतीने रिक्षाचालकांसाठी अन्य धान्य किट वाटप