पुणेकरांना मोठा दिलासा, पाणीपुरवठा करणारी चार ही धरणे 100 टक्के भरली.

0
slider_4552

पुणे :

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार ही धरणे भरली 100 टक्के भरली आहेत. खडकवासल्यासह पानशेत, वरसगाव, टेमघर फुल्ल झाले आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चार ही धरणात मिळून 99.94 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

खडकवासला धरणातून पाच हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरु झाला आहे. पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता ही यामुळे मिटली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरण भरले आहे.

खडकवासला धरण ९७ टक्के भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढला तर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

See also  छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबतच्या विषयात आठ दिवसात निर्णय : महापौर मुरलीधर मोहोळ