बाणेर :
पुणे महानगरपालिकेतील नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांची औंध प्रभाग समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, तसेच खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर यांची टेनिस हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या आयोजनाखाली बाणेर नागरी पतसंस्था, योगीराज पतसंस्था, श्रीराम पतसंस्था, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, नगरसेविका स्वप्नाली सायकर यांची निवड झाल्याने बाणेर गावाला एक महत्वाचे पद मिळाले आहे. त्यामुळे बाणेर गावच्या विकासात भर पडणार आहे. अशा महत्वाच्या पदी निवड झाल्याने बाणेर गावची सून म्हणून त्यांचा सन्मान करणे महत्वाचे होते. खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर यांची टेनिस हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करत आहे.
या प्रसंगी ज्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रवी घाटे यांनी सांगितले की, पदे येतात जातात परंतु गावातील आपुलकी जिव्हाळा प्रेम टिकून राहिले पाहिजे. याकरिता सर्वांनी एकत्रित येऊन असे सलोख्याचे कार्यक्रम घेतले पाहिजे. यामुळे गावातील वातावरण चांगले आहे असे समजते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की, योगिराज नागरी, बाणेर नागरी पतसंस्था व भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ असे सत्कार समारंभ वेगवेगळे न घेता सर्वांनी मिळून एकत्रित रीत्या सामाईक सत्कार करावा, म्हणून व्यासपीठावर बाणेर बालेवाडी तील सर्व राजकीय पक्षातील नेते एकत्रित आले आहे. एकीकडे माणुसकी हरवत चालली असताना ती टिकविण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केला आहे. माणुसकीच्या झरा वाहत ठेवण्यासाठी ही सुरुवात आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
सत्कारला उत्तर देताना नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी सांगितले की घरच्या लोकांनी केलेला सत्कार हा फार मोठा आनंद देतो. या संस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा वाढली आहे, जबाबदारी वाढली आहे. तसेच खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक गणपत बालवडकर यांनी सांगितले की, हा सन्मान आम्हा सर्वांना नेहमी मदत करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान आहे. त्यांनी सुरुवातीला केलेल्या मदतीमुळेच हा सन्मान मिळाला आहे.
या वेळी बाणेर गावात स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात येत असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन च्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी तर, संजय बालवडकर यांच्या वतीने एक लाख अकरा हजार व राहुल पारखे यांच्यावतीने 51000 व गजानन कळमकर यांच्यावतीने 51 हजार असा निधी देण्याचा जाहीर करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे, योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, सत्कारमूर्ती गणपत बालवडकर, मा. नगरसेवक शिवाजी बांगर, डॉ. सागर बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, अनिकेत मुरकुटे, जिवन चाकणकर, प्रकाश बालवडकर, राम गायकवाड, राजेंद्र मुरकुटे, विजय विधाते, दत्तात्रय तापकीर, लक्ष्मण सायकर, संजय बालवडकर, राजेश विधाते, ॲड. पांडुरंग थोरवे, विशाल विधाते, सत्कारमूर्ती गणपत बालवडकर, नितिन कळमकर, ॲड. दिलिप शेलार, पूनम विधाते, सुषमा ताम्हाणे आदी उपस्थित होते.