पाषाण : प्रतिनिधी :-
पाण्याची गळती पाईप लाईन दुरूस्ती करण्या ऐवजी पालिकेने डांबरीकरण करून खड्डे मुजवण्यात आले. यामुळे दुसऱ्या दिवशी डांबर वाहून गेल्याने पुन्हा खड्डे पडला आहे. दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याने नागरिकांच्या कर रुपी पैशातून मिळालेल्या निधीचे नुकसान होत आहे.
सुतारवाडी गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याच ठिकाणी पाण्याची लाईन देखील तुटली होती. ही लाइन त्वरित दुरुस्त करून खड्डे बुजवणे अपेक्षित असताना. सुतारवाडी मधील काही युवा नेत्याच्या सांगण्यावरून प्रशासनाने तत्परता दाखवत डांबरीकरण केले, परंतु पाणी पुरवठ्याची लाईन दुरुस्त करण्या अगोदरच हे डांबरीकरण झाल्याने पाण्यातच डांबर टाकण्याचा प्रकार श्रेय वादासाठी पहायला मिळाला. यामुळे दुसऱ्याच दिवशी दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पहायला मिळत होते.
स्वीकृत सदस्य शिवम सुतार यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दोन विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात विकास कामे करण्याची मागणी केली. तसेच क्षेत्रीय कार्यालयाला कळल्याशिवाय दुरुस्तीची कामे करण्यात येऊ नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.