भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची पहिल्यांदाच झाली भेट

0
slider_4552

अमेरिका :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात शुक्रवारी भेट झाली. बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच त्यांना प्रत्यक्ष भेटले.

या बैठकीवेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, “तुमच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिकेचे संबंध विस्तारण्यासाठीचं बी पेरलं गेलं आहे.” “आजची द्विपक्षीय चर्चा महत्त्वाची आहे. आपण या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला भेटत आहोत. हे दशक कसं आकाराला येतं, यामध्ये तुमचं नेतृत्व नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत होण्यासाठी हे बीज पेरलं गेलं आहे.”

जो बायडन यांनी गांधी जयंतीचा उल्लेख केला. त्यावर “गांधीजी विश्वस्ताची भूमिका निभावण्याबद्दल बोलले आहेत. ही एक संकल्पना आहे जी येत्या काळात आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे,” असंही मोदी म्हणाले.

बायडन यांनी नमूद केलेले प्रत्येक विषय भारत-अमेरिका मैत्रीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोव्हिड-19, हवामान बदल आणि क्वाड यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत, असं मोदी पुढे म्हणाले.

“व्यापाराला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशामध्ये स्वतःचं असं महत्त्व आहे. या दशकात आपण एकमेकांना पूरक असू शकतो. अमेरिकेकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भारताला आवश्यक आहेत आणि भारताकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकतात. या दशकात व्यापार हा प्रमुख मुद्दा असेल,” असं मोदींनी नमूद केलं.

बायडन यांना भेटण्यापूर्वी मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली. मॉरिसन आपले मित्र असल्याचं मोदींनी सांगितलं.

त्यांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी म्हटलं, “माझे चांगले मित्र, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत चर्चेचा नेहमीच चांगला अनुभव असतो. त्यांच्यासोबत वाणिज्य, व्यापार, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याची चर्चा केली.”

या दौऱ्यात मोदींनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबतही चर्चा केली.

या चर्चेनंतर मोदी म्हणाले, “जपान भारताच्या सर्वात महत्त्वाच्या भागीदारांपैकी एक आहे. जपानचे पंतप्रधान सुगा यांच्यासोबतची चर्चा चांगली झाली. विविध विषयांवर चर्चा झाली, यात दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला गेला. भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य जगासाठीही चांगले ठरतील.”

See also  इराणचे सर्वात मोठे जहाज खर्ग आगीनंतर ओमानच्या खाडीमध्ये बुडाले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज म्हणजे 24 सप्टेंबर रोजी हा दौरा संपणार आहे.

अमेरिकेतील टॉप-5 कंपन्यांच्या सीईओंसोबत मोदींची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील सौरऊर्जा, 5जी तंत्रज्ञान, ड्रोन इत्यादी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) चर्चा केली.

मोदींनी कुणा कुणाशी चर्चा केली?

क्वालकॉमचे सीईओ ख्रिश्चिाओ अमॉन
ॲडोबचे सीईओ शंतनू नारायण
फर्स्ट सोलारचे साईओ मार्क विडमर
जनरल ऑटोमिक्सचे सीईओ विवेक लल्ल
ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टिफन ए शॉर्झमन

https://twitter.com/narendramodi/status/1441204813040001025?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1441204813040001025%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F