पुणे :
पुण्यातील भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यानंतर आता सर्वत्र एकच संताप व्यक्त केला जातोय.







तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून राजकारण देखील तापलेलं दिसत आहे. त्यातच आता कथित संबंधित आमदार सुनील कांबळे यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.
सध्या व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप माझी नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे.
व्हायरल होत असलेला ऑडिओत असणारा आवाज हा माझा आवाज नाही. हे विरोधकांचं षडयंत्र आहे. गेली 25 वर्ष त्यांना जे जमलं नाही ते काम मी करून दाखवलं आहे. त्यामुळे विरोधक माझ्याविरोधात कटकारस्थान रचत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने आमदार सुनील कांबळे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. त्यानंतर सुनिल कांबळे यांनी पुणे पोलिसांकडे माझी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.








