आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या फोटो सेशन वर मनमोहन सिंग यांची मुलगी भडकली

0
slider_4552

नवी दिल्ली :

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्था असल्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात भरती आहे. मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे अशी माहिती एम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना भेटण्यासाठी बरेच राजकीय नेते येत आहेत. परंतु, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केलेल्या एका कृत्यामुळे आता मनमोहन सिंग यांच्या मुलीने आरोग्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे.

मनसुख मांडविया एम्स रूग्णालयात मनमोहन सिंग यांना भेटायला गेले होते. तिथे मनसुख मांडविया यांनी स्वत: चे मनमोहन सिंग यांच्याबरोबर फोटो घेतले आहेत. त्यावरून मांडविया यांच्यावर टीका केली जात आहे. आता मनमोहन सिंग यांच्या मुलीने माझ्या आईने फोटोग्राफरला अनेकदा बाहेर जाण्यास सांगितले परंतु त्यांनी ऐकले नाही. माझ्या वडिलांचे फोटो घेतल्याने माझी आई नाराज झाली होती, असं मनमोहन सिंग यांच्या मुलीने म्हटलं आहे.

‘आमचं कुटूंब सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. ते वयस्कर आहेत. ते कोणत्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी नाहीत’, असं मनमोहन सिंग यांच्या मुलीने म्हटलं आहे. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक हक्काचं उल्लंघन केल्यामुळे मनसुख मांडवियांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मनसुख मांडविया फोटोग्राफर घेऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटायला गेले होते. फोटो घेण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या कुटूंबाचा विरोध असताना त्यांनी फोटो घेतले , असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे . मनसुख मांडविया यांचा हा पीआर स्टंट आहे, असंही काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

See also  घरोघरी पिझ्झा जातो तर रेशन का नाही जावू शकणार ? : अरविंद केजरीवाल