पुणे शहरातील शाळा ४ जानेवारी पासुन सुरु होणार.

0
slider_4552

पुणे –

महापालिका क्षेत्रामधील सर्व शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी जाहीर केले. राज्यातील जवळपास ७० टक्के शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असतानाच आता पुण्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

राज्यातील शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा सुरवातीला १३ डिसेंबरपर्यंत बंद राहतील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर पुन्हा ३ जानेवारी २०२१ पर्यंत शाळा बंद राहतील, असा आदेश महापालिकेने १२ डिसेंबरला काढला होता.

आता महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू करण्याला परवानगी दिल्याचे आदेश विक्रम कुमार यांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे.

– थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर, जंतुनाशक अशा आवश्यक

– वस्तूंची उपलब्धता असेल याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी.

– शाळा वाहतूक सुविधांचे नियमित निर्जंतुकीकरण आणि त्याची शाळा व्यवस्थापनामार्फत पडताळणी आवश्यक.

– सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची”कोविड-१९’साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक.

– वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी.

– वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी.

– शाळेच्या दर्शनी भागावर शारीरिक अंतर, मास्कचा वापरया बाबत मार्गदर्शक सूचना असाव्यात.

– विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांना किंवा पर्यवेक्षकांना सादर करावी.

See also  ५ लाख हुन अधिक घरात एमएनजीएल गॅस च्या पाईपलाईनची सुविधा देणार : गिरीश बापट