बावधन मध्ये सुर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर…

0
slider_4552

बावधन :

सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय व सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ब्लड सेंटर आणि सूर्यकांत भूंडे सोशल फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या परिस्थिती हॉस्पिटलची रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले होते. मोठ्या उत्साहात सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना सूर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशन च्या वतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली.

रक्तदान शिबिराची माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भूंडे यांनी सांगितले की, सध्या हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असल्याचे समजताच आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरवले. यावेळी सर्वच मित्रपरिवाराने उस्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून माणुसकीचा नातं जपलं त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. 

राष्ट्रवादीचे नेते सुनिल चांदेरे, माजी सरपंच राजेंद्र भुंडे, मा.सरपंच निलेश दगडे, ग्रा.सदस्य आझाद दगडे, तटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग दगडे, मा.उपसरपंच नंदकुमार दगडे, मा.ग्रा सदस्य सचिन दगडे, संजय दगडे, मा.उपसरपंच बापुसाहेब दगडे, मा.उपसरपंच अमोल दगडे, उपसरपंच दिपक दगडे, आरपिआय नेते उमेश काबंळे, मा.उपसरपंच मयुर काबंळे, बाळासाहेब भुंडे, माऊली भुंडे, भाऊसाहेब दगडे, सदाशिव घुले, गणपत भुंडे, प्रदीप दगडे, काशीनाथ दगडे, रमेश भुंडे, नितीन दगडे, प्रशांत दगडे, बाबाजी दगडे, उल्हास दगडे, संतोष तोंडे राजेंद्र वेडे, मा.ग्रा सदस्य अजित दुधाळे, राजेंद्र मारणे, तुषार दगडे आदि मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.

See also  बाणेर येथील सुमित तापकीर ची खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई.