पुणे :
पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग येत्या गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पालक मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करून एकमताने निर्णय घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्यात 16 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार आहेत. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यातील शाळांना पुन्हा कुलूप लागणार का? अशी परिस्थीती होती, परंतु राज्य सरकारने यावेळी सावध पावलं टाकण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्या अनुशंगाने नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात शाळा वेळेवर सुरु झाल्या नाहीत.
दरम्यान राज्यभरात प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घेतला होता. मात्र, त्यानंतर कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रॉनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई, पुणे येथील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. १५ डिसेंबरपर्यंत मुंबई आणि पुण्यामधील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली होती. आता पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.
पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग गुरुवारपासून !
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (१६ डिसेंबर, २०२१) सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/Kvse0mrGeL
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 14, 2021