अमेरिका :
नासाच्या शास्त्रज्ञांना इतिहासातील सर्वात मोठे यश मिळालेले आहे. पार्कर सोलर प्रोब नाव असणाऱ्या एका स्पेसक्राफ्टने सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याचा विक्रम केला आहे.
आजवर कोणत्याही स्पेसक्राफ्ट सूर्याच्या इतके जवळ गेलेले नव्हते.
Success of NASA scientists! NASA spacecraft touches sun
जशी पृथ्वीवर जमीन आहे, तशी सूर्यावर कोणतीही जमीन नाहीये. तिथे फक्त सुपर हिटेड अॅटमॉस्पियर आहे. सूर्यामध्ये सतत होणाऱ्या लाखो करोडो केमिकल प्रक्रियांमधून बाहेर पडणाऱ्या सौर कणांना गुरुत्वाकर्षण आणि मॅग्नॅटिक फोर्सेसद्वारे सूर्य आपल्या कक्षे मध्येच ठेवतो.
सूर्याभोवती असणाऱ्या सर्वात बाहेरील थराला कोरोना असे म्हणतात. सूर्यामध्ये तयार होणाऱ्या सौर वादळांना सूर्याच्या कक्षेत थांबवण्याचे काम हा कोरोना लेयर करतो. सूर्यातून बाहेर पडणारे पार्टिकल्स जेव्हा एका मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर येतात तेव्हा त्या लेयरला क्रिटीकल सरफेस असे म्हणतात.
तर ह्या कोरोना लेयरच्या आत जाण्याचा विक्रम पार्कर सोलार प्रोब या स्पेसक्राफ्टने केला आहे. 28 एप्रिल 2021 रोजी या स्पेसक्राफ्टने एकूण तीनवेळा कोरोना लेयरच्या आत प्रवेश केला होता. एका वेळे तर तब्बल 5 तासांसाठी हे स्पेसक्राफ्ट कोरोना लेयरच्या आत थांबले होते.
आता तुम्ही म्हणाल की, सूर्याच्या इतक्या जवळ जाऊनही सूर्याच्या उष्णतेमुळे स्पेसक्राफ्टला कशी काय हानी पोहोचली नाही? तर संपूर्ण स्पेसक्राफ्ट हिट शील्डने कव्हर करण्यात आले होते. फक्त दोन उपकरणांना सोडून. यापैकी एक उपकरण म्हणजे सोलर प्रॉब कप. या कपमध्ये सूर्या मधून बाहेर पडणारे काही पार्टिकल्स या कपने कलेक्ट केलेले आहेत. हा कप हाय मेल्टिंग पॉईंट असणाऱ्या पदार्थांपासून बनवण्यात आलेला आहे. जसं की टंग्स्टन, मॉलिब्डेनम, सफायर, निओबीयम.
सूर्यातून बाहेर पडणारे सौर पार्टिकल्सचे तापमान 1800 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे जवळजवळ 1000 डिग्री सेल्सियस पेक्षाही अधिक होते. हे सर्व पार्टिकल्स सूर्याचा तप्त गोळा जसा लाल आणि नारंगी रंगाचा दिसतो तसेच आहेत.
हे कप बनवण्यामध्ये अनेक सायंटिस्ट्नी इंजिनीअर्सचा हात आहे.
सोलर प्रोब कपच्या या अचिव्हमेंटमुळे शास्त्रज्ञांना आता वर्षानुवर्ष न उलगडलेल्या मिस्ट्रीचे उत्तर मिळणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर तापमान 5500 डिग्री सेल्सिअस इतके आहे. तर सूर्याच्या सर्वात बाहेरच्या लेयरचे तापमान 2 मिलियन डिग्री सेल्सियस आहे. असे का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास आता शास्त्रज्ञांना मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे तयार होणाऱ्या अनेक वादळांचा परिणाम पृथ्वीवर असणाऱ्या पॉवर सप्लाय आणि रेडिओ कम्युनिकेशनवर देखील होतो. या सर्वाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना मदत होणार आहे.
https://twitter.com/NASA/status/1470809227048464400?s=20