नवी दिल्ली :
टाटा कंपनीने एअर इंडिया औचारिकरित्या ताब्यात घेतली आहे. त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी असताना एअर इंडियाच्या विमानात हळूहळू चांगले बदल होण्यास सुरुवात झाली आहे.,त्याची प्रचिती माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आली. त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले.







पी. चिदंबरम म्हणाले, मी दिल्ली -गोहत्ती मार्गावर एअर इंडियाच्या विमानातून नुकताच प्रवास केला. तेव्हा मला विमानाच्या सेवेत चांगले बदल दिसले. कर्मचारी यांनी चांगला नाष्टा दिला. त्या बरोबर रुमालही होता.
तसेच प्रवासात वाचायला मॅगझीन आणि वृत्तपत्रही सोबत देण्यात आले. हा एका चांगला बदल होत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी कौतुकाने सांगितले.








