भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन.

0
slider_4552

पुणे :

पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश लडकत (वय ५३) यांचे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती अयशस्वी झाल्याने त्यांचे निधन झाले.

११ ऑक्टोबर १९६७ रोजी लडकत यांचा जन्म झाला. नगरसेवक लडकत हे खासदार गिरीश बापट यांच्या खंदे समर्थकांपैकी एक होते. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, उद्यम सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्षपद ही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक कन्या, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

See also  माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे राष्ट्रवादी काँगेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी