देशातील 15 शहरांमधील ईएसआय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणीची सुविधा

0
slider_4552

दिल्ली :

ESIC संबंधित कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपिंदर यादव यांनी शनिवारी सांगितले की, आता देशातील 15 शहरांमधील ईएसआय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याआधी या यादीत केवळ 5 शहरांचा समावेश होता. आता यामध्ये 15 शहरांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

शासन हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवत आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कर्मचारी मोफत तपासणीचा लाभ घेऊ शकतील आणि ते ESI रुग्णालयांमध्ये आरोग्याशी संबंधित सेवा घेऊ शकतील. डिसेंबर 2021 मध्ये, कामगार मंत्रालयाने ESI कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम सुरू केला. याआधी ही सुविधा अहमदाबाद, फरिदाबाद, हैदराबाद, वाराणसी आणि कोलकाता येथे उपलब्ध होती. आता आणखी 10 शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील ESI प्रायोगिक योजनेत केवळ 5 शहरांचा समावेश करण्यात आला होता. त्याचे यश पाहता, 15 शहरांमध्ये सुविधा वाढ करण्यात आली आहे. कामगार मंत्र्यांनी सांगितले की, ईएसआयसीने आपल्या बैठकीत याला मान्यता दिली आहे. या प्रायोगिक योजनेअंतर्गत, कारखाने आणि एमएसएमईशी संबंधित कामगार मोफत आरोग्य तपासणीचा पूर्ण लाभ घेऊ शकतील. या कर्मचाऱ्यांना ESIC द्वारे माहिती दिली जाईल आणि मोफत आरोग्य तपासणीची माहिती दिली जाईल. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, कर्मचारी किंवा कामगार ईएसआय रुग्णालयात आरोग्य तपासणी करू शकतील. यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

जर एखाद्या कारखान्यात किंवा MSME युनिटमध्ये 10 ते 15 कर्मचार जरी असतील तरी ते जवळच्या ESI हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत आरोग्य तपासणी करू शकतात. कामगार मंत्री म्हणाले की, ईएसआयसी रुग्णालयांमधील डॉक्टरांची कमतरता पूर्ण करण्यासाठी सरकार यावर्षात 5 हजार भरती करणार आहे. ईएसआयएस रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. येथे ESIS म्हणजे राज्य सरकारे चालवत असलेली रुग्णालये. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करण्याचा विचार केला जात आहे.

See also  पीएम केअर फंडाचा हिशोब मागणी पत्र प्रधानमंत्री यांना.

ईएसआयसी रुग्णालयांमध्ये डिजिटायजेशन वाढ केले ​​जाईल आणि रुग्णांच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल स्वरूपात संग्रहित केल्या जातील. ESIC कडे असलेल्या सर्व विमाधारक लोकांच्या आरोग्य नोंदी डिजिटल असतील. त्यामुळे त्यांना आरोग्य तपासणीच्या फाइलबरोबर ठेवण्याची गरज भासणार नाही. ESI सदस्यांच्या आरोग्य नोंदी आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये समाविष्ट केल्या जातील. यासह ई-संजीवनी पोर्टलद्वारे टेलि-मेडिसिन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जर एखादा कर्मचारी एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत गेला तर त्याला ईएसआय सुविधा घेताना कोणतीही अडचण येत नाही, यासाठी लवकरच डिजिटल ट्रान्सफर पॉलिसी आणली जाईल. यासह, सर्व ईएआय रुग्णालयांच्या पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येची माहिती उपलब्ध होणार आहे.