बालेवाडी :
आज स्मार्ट सिटी व पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बालेवाडी येथील साई चौक येथे दहा हजार स्क्वेअर फूट मध्ये ३८ गाळ्यांच्या अद्ययावत भाजी मंडईचा भूमिपूजन समारंभ भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश जी मुळीक यांच्या हस्ते पार पडला.
या वेळी बोलताना भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, बाणेर बालेवाडी परिसरामधील नगरसेवक अमोल बालवडकर तसेच नगरसेविका स्वप्नाली सायकर व नगरसेविका ज्योती कळमकर यांनी केलेल्या कामामुळे या प्रभागांमध्ये यावेळी ‘शतप्रतिशत भाजपा’ हा नारा यशस्वी होणार तसेच या प्रभागांमधील सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असं मला विश्वास आहे
या कार्यक्रमाचे माहिती देताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, अशा वास्तूंमुळे परिसरात स्थानिक भाजी विक्रेत्यांना सुनियोजित हक्काची जागा देता येईल, रस्त्यावर होणारे अतिक्रमण रोखता येईल तसेच, नागरिकांनाही दैनंदिन अत्यावश्यक असलेल्या भाजी खरेदीसाठी एक उत्तम ठिकाण मिळेल. भविष्यात देखील अशी लोकउपयोगी कामे सुरूच राहतील.
याप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा नेते प्रकाश बालवडकर, मा.नगरसेवक सनी निम्हण, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब रानवडे, आशाताई बालवडकर, युवा नेते लहुशेठ बालवडकर, उमा गाडगिळ, शहर उपाध्यक्ष सुनिल माने, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, प्रकाशतात्या कि.बालवडकर, शिवम बालवडकर, शशिकांत बालवडकर, नितिन रनवरे, किरण तापकिर, अनिल बालवडकर, आत्माराम बालवडकर, दत्तात्रय बालवडकर, मंदार राराविकर, सुभाष भोळ, रिना सोमैया, राखी श्रीवास्तव, रोहित पाटील व परिसरातील सर्व ग्रामस्थ व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.