पुणे :
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्हेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे यांच्या यजमानपद खाली होणाऱ्या 69 व्या वरिष्ठ गट पुरुष/महिला राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दिनांक 28 फेब्रुवारी ते 3 मार्च 20 ते 22 या कालावधीत बंदऱ्या मारुती क्रीडांगण मू.पो. काल्हेर ता. भिवंडी जि. ठाणे येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा पुरुष आणि महिला विभागाचा प्रातिनिधिक संघ निवडण्यात आला आहे. याची माहिती पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह मधुकर नलावडे यांनी कळविली आहे.
पुरुष विभाग संघ : १) गोकुळ तोडकर (कर्णधार), २) गणेश कांबळे, ३) सचिन पाटील, ४) विनीत कालेकर, ५) कृष्णा शिंदे,६) तन्मय चव्हाण, ७) ऋतिक जाधव, ८) शुभम पाटील, ९) अजित चव्हाण, १०) प्रथमेश निघोट, ११) अक्षय बोडके, १२) सोमनाथ लोखंडे
प्रशिक्षक – विलास नाईक, व्यवस्थापक – अनिल यादव
महिला विभाग संघ : १) ऋतिका होनमाने (कर्णधार), २) अंकिता जगताप, ३) सायली केरीपाळे, ४) स्नेहल शिंदे, ५) पूजा शेलार, ६) दिव्या गोगावले, ७) स्वप्नाली पासलकर, ८) मानसी रोडे, ९) सिद्धी मराठे, १०) निकिता पडवळ, ११) सिद्धी बलकवडे, १२) साक्षी काळे
प्रशिक्षक – योगेश यादव, व्यवस्थापक – कांचन चुनेकर
हा संघ निवडताना पूर्वी गटासाठी निवड समिती सदस्य म्हणून राजेंद्र अण्णा देशमुख, दत्तात्रय कळमकर आणि प्रकाश पवार यांनी काम पाहिले. तर महिला गटामध्ये निवड समिती सदस्य म्हणून अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, निलेश लोखंडे शितल मारणे (जाधव) यांनी काम पाहिले.