बाणेर :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाणेर यांच्या वतीने मनसे कोथरुड विधानसभा उपाध्यक्ष अनिकेत मुरकुटे यांच्या माध्यमातून आज रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ठीक १० ते १२.३० वाजे पर्यंत मराठी राजभाषा दिनानिमित्त “मी मराठी स्वाक्षरी मराठी” अभियान मनसे जनसंपर्क कार्यालय, बाटा शोरुम शेजारी बाणेर येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पाच वर्ष वयाच्या लहान मुलांन पासुन ते ७० वर्ष वयाच्या शिक्षिका पर्यंत नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून मराठी मध्ये सही करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या अभियानाची माहिती देताना मनसे युवा नेते अनिकेत मुरकुटे म्हणाले की, मी मराठी माझी भाषा मराठी माझी स्वाक्षरी सुद्धा मराठी, म्हणूनच परिसरामध्ये मराठी राज्यभाषा दिनानिमित्त “मी मराठी स्वाक्षरी मराठी” अभियान राबविण्यात आले. आपल्या भाषेचा आपल्याला असलेला अभिमान यानिमित्ताने प्रकट होत असतो. सर्व नागरिकांनी या अभियानास चांगला प्रतिसाद दिला आणि मराठीतून स्वाक्षरी करून अभियान यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले आहे.
यावेळी राजेंद्र वेडेपटील, मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारूडकर, जेष्ठ नागरिक नंदकिशोर काबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय वाघदुळे, सारंग वाबळे, मनोज धारपे, अनिकेत मुरकुटे, अमित राऊत, किरण रायकर, गणेश चव्हाण, शशिकांत घोडके, स्वानंद लोंढे, मोहन पाडाळे, प्रतीक भुजबळ, शुभम मुरकुटे, अक्षय मुरकुटे, संजय जाधव, किशोर रायकर आणि परिसरातील तरुण युवक तसेच नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.