बाणेर :
सुस-म्हाळुंगे गावांसोबत पुणे म.न.पा. हद्दीत समाविष्ठ गावांच्या पाणी प्रश्नाबाबत उच्च न्यायालयामध्ये पी. एम. आर. डी. ए. व पुणे महानगरपालिकेच्या विरोधात अमोल बालवडकर यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत बद्दलची माहिती देण्याकरता नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ॲड. सत्या मुळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.
या जनहित याचिका ची माहिती देताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, सुस आणि म्हाळुंगे गावचा पाणी प्रश्न अतीशय गंभीर आहे. पुणे महानगर पालिकेत या गावांचा समविष्ट झाल्यानंतर या गावांची जबाबदारी देखील पुणे महानगरपालिकेने घेणे गरजेचे आहे. परंतु ह्या दोन्ही संस्था आपल्या जबाबदाऱ्या झटकून नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्षित करत आहे. सुस-म्हाळुंगे परिसरातील जवळपास शंभर सोसायट्यांनी पाणी प्रश्न सोडवावा म्हणून निवेदन पत्र मला दिली आहे. त्यामूळे नागरिकांच्या मागणी कडे लक्ष देवून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे.
पी. एम. आर. डी. ए. आणि पुणे महानगरपालिका या दोन्हींच्या समन्वयाअभावी सुस – महाळुंगे गावचा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. या दोन्ही संस्था समाविष्ट गावांच्या पाणी प्रश्नाबाबत गंभीर नाही, त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात समाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणूनच ॲड. सत्या मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली समाविष्ट गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने जनहित याचिका दाखल केली आहे.
मागील आणि दिवसापासून पी. एम. आर. डी. ए. आणि महानगरपालिका यांच्याकडे समाविष्ट गावांच्या पाणी प्रश्नाबाबत पाठपुरावा करून देखील कोणते समाधानकारक उत्तर या दोन्ही संस्थांनी दिलेले नाही. पाठवले भविष्याच्या दृष्टीने विचार करत या दोन्ही गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणे करता या दोन्ही संस्थांनी नियोजन करणे आवश्यक होते. परंतु याबाबतीत या दोन्ही संस्था उदासीन आहेत. पुणे महानगर पालिकेने या दोन्ही गावांचा आराखडा स्पष्ट करावे. माननीय उच्च न्यायालयाने लक्ष देवून या दोन्ही गावांना पाणी देण्याची जबाबदारी कोणाची हे स्पष्ट करावे. या विषयात लक्ष घालून सर्व सामान्य नागरिकांची पाणी प्रश्नापासून सुटका करावी. अशी अपेक्षा नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली.
पी. एम. आर. डी. ए. आणि पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने हस्तक्षेप करून सदर चा गंभीर प्रश्न मार्गी लावावा यासाठी आमचा प्रयत्न राहील असे ॲड. सत्या मुळे यांनी सांगितले.