भाजप आणि टीएमसीच्या आमदारांमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेत तुफान हाणामारी

0
slider_4552

कोलकाता :

भाजप आणि टीएमसीच्या आमदारांमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेत तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडले. या हल्ल्यात टीएमसीचे आमदार असित मजुमदार जखमी झाले असून त्यांना कोलकाताच्या पीजी रुग्णालयातील वुडनवर्ड वॉर्डात भरती करण्यात आले असल्याची माहिती आहे.

टीएमसीचे आमदार शौकत मोल्ला आणि महिला आमदार महिलांनी विधानसभेच्या सुरक्षा रक्षकांच्या साथीने भाजपच्या आमदारांवर हल्ला चढवल्याचा आरोप भाजप नेते शुभेंद्रू अधिकारी यांनी केला आहे. आमदार मनोज टिग्गा यांचे कपडे फाडण्यात आले आहेत. तर नरहरी महतो यांना जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हाणामारी झाली त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीया सभागृहात नव्हत्या. त्या दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांना खबर देण्यात आली आहे.

बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जे काही झालं ते दुर्देवी आहे. आमदार विधानसभेच्या नियमांचा अभ्यास करत नाहीत. त्यांना विधानसभेचं महत्त्व कळत नाही. विधानसभेत हंगामा करणं हाच त्यांचा हेतू आहे, असं बिमान बॅनर्जी यांनी सांगितलं.

https://twitter.com/amitmalviya/status/1508333203530018816?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1508333203530018816%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील परेडमध्ये सहभागी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ पुरस्कार