घोटावडे फाटा येथे मुळशी केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन..

0
slider_4552

बावधन :

मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा या ठिकाणी रविवारी मुळशी केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन मुळशी केसरी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती देण्याकरिता मुळशी केसरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या ऑफिस मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.

या स्पर्धेची माहिती देताना कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल म्हणाले की, मुळशी करांचा फार मोठा कुस्तीचा इतिहास आहे. या स्पर्धेचे हे विक्रमी सोळावे वर्ष आहे. मुळशी तालुक्यात मानाची समजणारी मुळशी केसरी स्पर्धा अतिशय चुरशीची आणि कुस्ती शौकिनांना आनंद देणारी ठरेल. नामवंत पैलवान या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत. दोन वर्षाच्या कालखंडानंतर मुळशी मध्ये कुस्ती चा आवाज घुमणार आहे.

मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या संयोजन कमिटी च्या वतीने स्पर्धेची माहिती देण्यात आली. ही स्पर्धा 57 किलो, 61 किलो, 65 किलो, 70 किलो, 74 किलो व खुला गट अशा वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटामध्ये एकूण चार क्रमांक काढले जाणार असल्याची माहिती देखील संयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आलेली आहे.

या स्पर्धेमध्ये “अमृता किताब चषक” ची कुस्ती ही नामांकित मल्ल महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व मुंबई महापौर केसरी भारत मदने या दोन मल्लांमध्ये होणार आहे.विजेत्या सर्व मल्लांना आकर्षक चषक व भरघोस रक्कम दिली जाणार आहे.

याच बरोबर तालुक्यातील नामांकित व कार्यशील निवडक व्यक्तींना मुळशी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर या स्पर्धेचे आयोजन मुळशी केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर मोहोळ, अध्यक्ष बाळासाहेब आमले, कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, संयोजक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुळशी केसरी प्रतिष्ठान संयोजन कमिटी मधील उमेश दरेकर,मयुरेश अरखडे, सचिन मोहोळ, महेश मानकर, राकेश गायकवाड, वैभव मुरकुटे, दत्ता काळभोर, प्रदीप दुबे, अमोल काटकर, जयदीप महाडिक, सुधांशू ताकवले, शरद भोईटे, समीर इंदलकर, रामदास गोळे, स्वप्नील देशपांडे, विजय शिंदे, संदीप ओबासे, शशिकांत दाभाडे, विशाल घारे, दीपक भरेकर, दिलीप पोळेकर, सुरेश मारणे, प्रतिक चौधरी, चेतन आदवडे, गणेश मगर, कृष्णा कोलते पाटील, नवनाथ बोडके, अनिल चव्हाण,सुशांत गोळे,मारुती पवळे, समीर शिंदे, ललित पोमण, अजिंक्य पालकर, आकाश शेरकर, गणेश लोखंडे, रमेश भरेकर, श्रीकांत काटकर, अजय काटकर, सुरज सांबरे, कमलेश गायकवाड, निलेश महेश्वरी, राकेश जव्हेरी, विशाल गोळे, योगेश सातपुते, महेश पोळ, मकरंद शेंडकर, यश बांदल, अमित बांदल, गणेश सोनवणे, दीपक कंदारे, प्रदीप साठे, रवींद्र चौधरी, गुरु कामशेट्टी, किरण कुठमने व इतर सर्व संयोजन कमिटी मधील सदस्य अहोरात्र प्रयत्न करीत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भास्कर मोहोळ यांनी दिली.

See also  चांदणी चौक काम वेगात पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश !