धक्कादायक : चादरी मध्ये गुंडाळून दिवसा मृतदेह फेकला !

0
slider_4552

पुणे:

धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली असून भर दिवसा  चादरीत गुंडाळलेला मृतदेह  मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर टाकण्यात आला त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली सुरुवातीला इतर काही वस्तू फेकली की काय म्हणून घाबरून नागरिकांनी पळ काढला परंतु चादरीत मृतदेह गुंडाळून फेकून दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एक टेम्पो आला. या टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह दोघांनी बाहेर काढला. त्यानंतर उद्यानासमोर तो फेकून दोघे जण पसार झाले. उद्यानाजवळील नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. नेमके चादरीत काय गुंडाळून फेकून दिले आहे, या भीतीने काही नागरिक तेथून पळून गेले. भरदिवसा घडलेला या भयानक प्रकाराने परिसरात खळबळ माजली. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना कळवले. चादरीत मृतदेह गुंडाळून तो फेकून दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

See also  पालिकेने भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकांची विक्री होणार : आनंद रिठे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती