बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस च्या वतीने योगीराज पतसंस्थेचा आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान.

0
slider_4552

बालेवाडी :

श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था बालेवाडी यांच्या वतीने योगीराज पतसंस्थेला राष्ट्रीय सहकार परिषदेचा आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांचा विशेष सन्मान श्री खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच यावेळी सलग पाच वेळा किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्ष झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. पांडुरंग थोरवे यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद ढोमे, पुणे बार असोसिएशन अध्यक्ष अँड. पांडुरंग थोरवे, योगीराज पथसंस्था शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक अँड. अशोक रानवडे पाटील उपस्थित होते.

See also  आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते : लहू बालवडकर.