औंध :
सुखाई प्रतिष्ठानच्या वतीने आज इंदिरा गांधी वसाहत औंध येथील “श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार” करण्यात येणार आहे. त्यानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार भूमिपूजनाची माहिती देताना सुखाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगितले की, आपल्या महाराष्ट्रात देव दैवतांना फार महत्त्व आहे. आपण सर्वच मोठ्या श्रध्देने देव-देवतांची मंदिरात येऊन मोठ्या सद्भावनेने पूजाअर्चा करत असतो. मंदिरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मंदिरात आल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. परिसरातील नागरिकांनी मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. म्हणूनच इंदिरा गांधी वसाहत मधील “श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार” करण्याचे मनात आले. मंदिराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने कसे होईल याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर जीर्णोद्धार करण्यात येईल.
याप्रसंगी शेठ गडसिंग, मोहन जंगम, शिवाजी साळुंखे, गुलाब जंगम, काका गरबडे, विजय लांडगे, आत्माराम सूर्यवंशी, अक्षय आढागळे, रितेश गडसिंग, पंकज घडसिंग, मयूर गुंजाळ, आनंद साठे, उमेश पवार, मोहन जंगम, किशोर माने, संतोष मोरे, गणेश धस, गणेश माने, गणेश माने, आप्पा गवळी तसेच सर्व श्री हनुमान मित्र मंडळाचे पदाधिकारी, जय हनुमान वडार संघ, श्री गजानन मित्र मंडळाचे पदाधिकारी, भारतीय स्वयंप्रकाशित संघाचे सर्व पदाधिकारी अखिल इंदिरा वसाहतीमधील सर्व हनुमान भक्त उपस्थित होते.