सुस, म्हाळुंगे व बावधन या गावांसाठी पुणे महापालिकेने १८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना केली मंजूर…..

0
slider_4552

पुणे :

पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणीप्रश्नाबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महापालिकेने सुस, म्हाळुंगे व बावधन या भागासाठी १८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याची माहिती दिली.

यासह फुरसुंगी, उरुळी देवाची या भागातील पाणीटंचाई संदर्भात देखील महापालिकेने तातडीची उपाययोजना करण्याचे मान्य केले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास द्यावयाच्या एकूण रकमेपैकी साडेचार कोटी रुपये तातडीने द्यायचे मान्य केले.

याप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाणी योजनांचे रखडलेले काम तातडीने सुरु करावे अशी विनंती केली. याच बैठकीत बावधन येथील कचरा प्रश्नासंदर्भात जनभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी विनंती महापालिका आयुक्तांना केली.

जनतेच्या पाणीप्रश्नाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाविकास आघाडी सरकारचे मनापासून आभार मानले.

See also  देखभाल दुरुस्तीच्या कामा मुळे पुणे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद