इंडोनेशिया :
भारतीय हॉकी संघाने आज एका अद्भुत, अविश्वसणीय खेळीचं दर्शन घडवलं आहे. हिरो हॉकी आशिया कपच्या तिसऱ्या सामन्यात यजमान इंडोनेशिया संघाला 16-0 च्या मोठ्या फरकाने मात देत भारताने थेट सुपर 4 अर्थात पुढील फेरीत एन्ट्री मिळवली आहे.




इंडोनेशियात सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध अनिर्णीत सोडल्यानंतर, जपानविरुद्ध 5-2 ने पराभव देखील मिळवला होता. त्यामुळे आज स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एका मोठ्या विजयाची गरज होती. त्यानुसार भारताने 16-0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत एन्ट्री मिळवली आहे.
आतापर्यंतच्या स्पर्धेत भारत
या स्पर्धेत दोन पूल आहेत. ज्यात पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून एका गोलची आघाडीू कायम ठेवली होती. पण अखेरच्या काही मिनिटांत पाककडून गोल करण्यात आल्याने सामना अनिर्णीत ठरला. तर दुसऱ्या सामन्यात मात्र जपानने सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. भारताने महत्त्वपूर्ण दोन गोल केले पण तोवर जपानने आघाडी वाढवल्याने अखेर भारत 5-2 ने पराभूत झाला. त्यानंतर आज भारताने 16-0 च्या मोठ्या फरकाने विजय मिळवत पुढील फेरी गाठली आहे.
तुलनात्मक कामगिरी भारत वि. पाक
भारताचे निकाल
वि. पाकिस्तान १-१
वि. जपान २-५
वि. इंडोनेशिया १६-०
पाकिस्तानचे निकाल
वि. भारत १-१
वि. इंडोनेशिया १३-०
वि. जपान २-३
भारताचे गोल करणारे खेळाडू
– दिपसन तिर्कीचे चार गोल (४२, ४७, ५९, ५९ व्या मिनिटास)
– सुदेव बेलिमग्गा याचे तीन गोल (४५, ४६, ५५ व्या मिनिटास)
– पवन राजभार (७०, ११), एस व्ही. सुनील (१९, २४), कार्ती सेल्वम (४०, ५६) यांचे प्रत्येकी दोन गोल
– उत्तम सिंग (१४, निलम संजीप सेस (२०), बिरेंदर लाक्रा (४१) यांचा प्रत्येकी एक गोल
भारताच्या सुपर फोरमधील लढती : वि. जपान (२८ मे), वि. मलेशिया (२९ मे) आणि वि. दक्षिण कोरिया (३१ मे).








