बाणेर:
योगीराज पतसंस्थेचा 26 वा वर्धापन दिन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने श्री क्षेत्र देहू येथील भंडारा डोंगरावर उभारण्यात येणा-या तुकाराम महाराजांच्या मंदीराला 1 लाख रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच लॉन टेनिस मधील राष्ट्रीय खेळाडू राधिका महाजनला 25 हजार, बाणेर युवा कबड्डी संघाला 25 हजार व पं. भिमसेन जोशी संगीत महोत्सवा करीता 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेला या वर्षी राज्यातील “आदर्श पतसंस्था” म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच चालू वर्षी 2 कोटी 60 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. 26 वर्षाच्या कालावधीत सर्व खातेदार, संचालक व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे संस्था आर्थिक क्षेत्रात प्रगती करत आहे. तसेच संस्थेने 26 वर्षात केलेल्या सामजिक बांधिलकीच्या जाणीवेतून गरजूंना केलेल्या मदतीचा लेखाजोखा मांडला.
याप्रसंगी निवृत्त धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, पुणे विद्यापीठाचे अध्यासन विभागाचे प्रमुख मुकुंदराव तापकीर, यशदा चे संशोधन अधिकारी डॉ.बबन जोगदंड, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिलीप फलटणकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, अर्चना मुसळे, मा.नगरसेवक तानाजी निम्हण, अमोल बालवडकर, सनी निम्हण, पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे मा.अध्यक्ष सचिन साठे, विद्यांचल स्कूलचे अशोक मुरकुटे, खंडेराय शिक्षण संस्थेचे गणपतराव बालवडकर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, श्रीराम पतसंस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर, दिलीप दगडे, सखाराम रेडेकर, भाजपा चे गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहु बालवडकर राष्ट्रवादीचे डॉ. सागर बालवडकर, समीर चांदेरे, विशाल विधाते, पूनम विधाते, गणपतशेठ मुरकुटे, संग्राम मुरकुटे, शिवसेनेचे राजेंद्र धनकुडे, बाळासाहेब भांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर, काँग्रेसचे जीवन चाकणकर मनसे चे रविंद्र गारुडकर, अनिकेत मुरकुटे, प्रविण शिंदे, उद्योजक शिवराज सिरसगे, रोहिदास मोरे, गुडविल इंडियाचे कालिदास मोरे, अविनाश कांबळे, विजय विधाते, रामदास विधाते, परिसरातील विवीध 11 बँकांचे प्रतिनिधी तसेच संस्थेचे सर्व संचालक, खातेदार कर्मचारी उपस्थित होते.
आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.