पाषाण :
तुकाई टेकडीवर सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी त्यांनी संस्थेच्या हरित कार्यास भेट दिली. वसुंधरा अभियानचे सर्व प्रकल्प, पाण्याच्या टाक्या, नियोजन पाहून प्रभावित झाले. वृक्षप्रेमी व विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केले.
वाकडे काम सरळ करुन जो समाजहिताचे काम करतो त्याची समाज दखल घेतो. वसुंधरा अभियानाचे शून्यातून निसर्ग संवर्धनाचे कार्य प्रेरणादायी आहे, असे यावेळी भरणे म्हणाले. त्यांनी वनविभागाला वसुंधरा अभियानास झाडे देण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी भरणे कुटुंबियांतर्फे एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले.
गणेशखिंडच्यावमाॅडर्न महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५० विद्यार्थ्यांनी व तीन प्राध्यापकांनी ९ मे ते १४ मेच्या दरम्यान तुकाई टेकडीवरील १५०० झाडांना पाणी दिले व १० सी सी टी खोदले. एकुण विद्यार्थ्यांनी १,७५,००० रु चे काम करुन या वृक्षसंवर्धनाच्या कामाची सुरवात केली. या कामाचे कौतुक म्हणून प्राचार्य डाॅ संजय खरात यांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियान बाणेर
येथे सन्मान केला.
प्राचार्य डाॅ संजय खरात सत्कार स्वीकारताना
म्हणाले,” २००० पूर्वी येथे टेकडी होती पण आता वसुंधरा फाउंडेशन मुळे येथे हिरवाई आली आहे. साधरणपणे पुढील ५ ते ६ वर्षात ही टेकडी हिरवाईचा आदर्श बनेल. यामागे वसुंधरा फाऊंडेशन, विविध महाविद्यालये व स्वयंसेवकांचा मोलाचा वाटा असेल. आमचे महाविद्यालय या कार्यात सतत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कामात हातभार लावेल.”
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण ,वनविभागाचे आर.एफ.ओ. सपकाळ, पी ई सोसायटीचे उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षीत, गरवारे कॉलेज रसायशास्त्र विभाग प्रमुख शोभा वाघमोडे, मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य खरात सर यांचाही वसुंधरा अभियान कडून सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ईनर व्हील क्लब व जेन झेड क्लबच्या वतीने मा भाग्यश्री शास्त्री व डाॅ निवेदिता दास यांनी झाडे लाऊन सहभाग नोंदविला.
मॉडर्न कॉलेज व गरवारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वसुंधरा हरित कार्यात सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यमंत्री भरणे यांनी विद्यार्थ्यांसमवेत पिंपळाचे झाड लावून वृक्षारोपण केले.