पुणे :
देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात नितीन महाराज मोरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. मात्र पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनाच भाषणापासून डावलण्यात आले. कार्यक्रमादरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्चर्यचकित होऊन उपमुख्यमंत्र्यांकडे हातवारे करून बोलण्याबाबत इशारा केला. पण सूत्रसंचालकाने नाव न घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांनी भाषण करावे असे खुणावले.
यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते असे म्हटले. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.
देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने हजारोंच्या संख्येने वारकरी आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
निवेदकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले. या वेळी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे हात दाखवत त्यांना बोलण्याची संधी द्या, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी केला. मात्र तरीही पालकमंत्री अजित पवार यांना का बोलू दिले नाही, या बाबत स्पष्टता आली नाही. या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संस्थांनवर नाराजीचा सूर ओढत आहेत. देहू संस्थान कडून खुलासा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.