अनिकेत मुरकुटे यांच्या वतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस सेवा भावी उपक्रमाने साजरा..

0
slider_4552

बाणेर :

मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त मनसे चे कोथरूड उपविभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे आणि सारिका अनिकेत मुरकुटे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मध्ये तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियान यांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्रभागातील रिक्षावाल्या काकांचा एक लाखांचा मोफत विमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काढण्यात आला. तसेच मातृ सेवा संस्था औंध येथे पुणे शहर मनसेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाची माहिती देताना मनसेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे म्हणाले की, मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे हे आमचे प्रेरणास्थान असून त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून वृक्षारोपण सारखे हरित कार्य करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील रिक्षावाले काका यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देशाने एक लाखाचा मोफत विमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काढण्यात आला. मोफत विमा काढल्याने रिक्षावाल्या काकांना त्याचा निश्चितच लाभ होणार आहे.

यावेळी मनसेचे अनिल वटकर, किरण रायकर, अमित राऊत, अभिजीत चौगुले, निलेश जाधव, गणेश चव्हाण, किशोर रायकर आणि मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

See also  बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सन्मान.