संतश्रेष्ठ तुकाराम महाराजा व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पुण्यात आगमन

0
slider_4552

पुणे :

आळंदीतील अजोळघरातून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. बुधवारी सायंकाळी लाखो वारकऱ्यांसह पालखीचे ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात पुण्यात आगमन झाले आहे.

आज आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्र्भिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान करून काल माउलींच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. पालखीचे दुपारी दीड वाजता कळस (नगर रस्ता) मध्ये पोहचली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार तसेच अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांची पालखीही दुपारी पावणे दोन वाजता बोपोडीतील हॅरिस पूलाजवळ पोहचली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, सहआयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पालखीचे स्वागत केले.

‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसाव्यासाठी थांबली आहे. उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने अवघी पुण्यनगरी ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरामुळे भक्तिमय झाली आहे.

संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले. आज सायंकाळी ‘संत तुकाराम महाराज की जय’, या जयघोषात पुण्यात आगमन झाले. संचेती पुलाजवळ संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी ५.५२ वाजता आली. पुणे बार असोसिएशनच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. संत तुकारामांची पालखी नानापेठेतील निवडूंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामाला आहे.

दोन वर्षांच्या खंडानंतर आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून आणि परराज्यातून हजारो भाविक पुण्यात दाखल झाले आहे. ऊन-सावलीच्या खेळात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली होती.वैष्णवांच्या मांदियाळीचा हा अवीट सोहळा भाविकांना अनुभवायला मिळत होता. महिला भाविकांची मोठी संख्या या वर्षी सोहळ्यात दिसून येत होती. दिंडीतील वारकऱ्यांच्या विठूनामाच्या, ज्ञानेबातुकोबाच्या जयघोषाला भाविकांचीही साथ मिळत होती. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे. पुण्यात दोन्ही पालख्यांचे दोन दिवस मुक्काम असतो. शुक्रवारी दोन्ही पालख्या आपआपल्या मार्गाने मार्गस्थ होणार आहेत.

See also  पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये महापालिकेची वैद्यकीय शहरी गरीब योजनेस मान्यता