शिवाजीनगर :
सालाबाद प्रमाणे दिनांक २२/६/२०२२ रोजी पुणे बार असोसिएशन तर्फे जिल्हा न्यायलाय चौकात स्वागत कक्ष उभारून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तसेच वारकरी भक्तांना राजगिरी चे लाडूचे व पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले.







यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी हेलिकॉप्टर मधून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.. पुष्पवृष्टी चे ते अनुपम्य दृश्य पाहण्यासाठी काही क्षण वारकरी दिंड्या सुद्धा स्तब्ध झाल्या व हरिनामाचा गजर करू लागल्या. अनेक न्यायाधीश व वकील मंडळींनी वारकऱ्यांच्या सोबत पावली केली व फुगडीचा फेर धरला. ७५ वर्षांहून अधिक इतिहास असणाऱ्या पुणे बार असोसिएशन च्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एवढा देदिप्यमान सोहळा पार पडला.
याप्रसंगी माजी खाजदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा छत्रपती संभाजी राजे यांनी बार असोसिएशन च्या स्वागत कक्षाला भेट दिली. तसेच पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख व पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महाराष्ट्र गोवा चे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप तसेच ॲड. दादाभाऊ शेटे (चेअरमन लॉयर्स कंझुमर सोसायटी )या सर्वांचे स्वागत पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांनी केले. तसेच जिल्हा न्यायाधीश क्र १ मा. भरूचा साहेब, जिल्हा न्यायाधीश क्र २ मा. नांदेडकर साहेब व मोठ्या प्रमाणावर न्यायाधीश उपस्थित होते. याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. संजय देशमुख व पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष मा. पांडुरंगजी थोरवे यांनी वाकडेवाडी ते जिल्हा न्यायलाय चौक येथे पर्यंत दोन्ही पालख्याचे सारथ्य केले.
याप्रसंगी प्रतिक्रिया देताना पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. मा.पांडुरंगजी थोरवे म्हणाले, मी व माझे कुटुंब हे देखील वारकरी सांप्रदायातून येत असल्याने पालखी सोहळा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर सोहळा होत असल्याने हा सोहळा अनुपम व्हावा यासाठी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी व्हावी ही इच्छा होती त्यामुळे हे नियोजन करण्यात आले. तसेच आमच्या वकीलांच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात त्यांचे स्वास्थ्य चांगले राहो व आनंदाच्या वातावरणात काम करता यावे यासाठी माऊलीं तुकाराम महाराजांकडे प्रार्थना केली.
या प्रसंगी सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष -ॲड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष- ॲड. लक्ष्मण येळे पाटील, सेक्रेटरी- ॲड. अमोल शितोळे, सेक्रेटरी – ॲड. सुरेखा भोसले, खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले, ऍड. अमोल दुरकर ॲड.तेजस दंडागव्हाळ,ॲड. कुणाल अहिर , ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.








