हॉटेलच्या स्वच्छतागृहांमध्ये वेटरने मोबाईल वरून केले चित्रीकरण : सुतारवाडी येथील घटना.

0
slider_4552

पुणे :

हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरुणीचे स्वच्छतागृहामध्ये वेटरने मोबाईलवरुन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमववारी साडे नऊ वाजता सुतारवाडी येथे घडली. याप्रकरणी वेटरविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाफिज अन्सारी (वय 18) असे गुन्हा दाखल झालेल्या वेटरचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू-मुंबई महामार्गालगत सुतारवाडी येथे ” हॅपी द पंजाब’ नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी तरुणी हि तिच्या कुटुंबीयांसमवेत सोमवारी रात्री साडेनऊ वाजता संबंधित हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. काही वेळाने तरुणी हॉटेलमधील स्वच्छतागृहामध्ये गेली.

तेव्हा हाफीज हा तरुणीचे मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे तरुणीच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे संतापलेल्या तरुणीने हाफीजला मोबाईल चित्रीकरणाबद्द जाब विचारला. या प्रकारामुळे हाफीज हा घाबरून तेथून पळून गेला.

दरम्यान, हॉटेलमध्ये घडलेल्या अशा घटनेमुळे फिर्यादी व तिचे कुटुंब संतप्त झाले त्यांनी या घटनेनंतर थेट चतुःश्रृंगी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हाफीज याला अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयीन कोठडी मध्ये रवाना केले आहे.

See also  बालेवाडी येथील रहिवाशांनी कर वसुली बद्दल दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महानगरपालिकेला नोटीस